Saturday, February 6, 2010

१००० आइलॅंड

११ /१० /०९    " कॉर्टलॅंड ते आलेक्सन्ड्रिया बे "  ११०  किमी  
"अलेक्ससन्द्रिया बे "  हे  पर्यटकांचे  मुख्य  आकर्षण आहे | ही जागा कॅनडा व यूएस या दोन्ही देशांच्या सीमा जोडणारी असून अदभूत आश्चर्यजनक पाण्याची जागा आहे | कॅनडा मधील ऑंटेरियो राज्यातुन वाहत असलेली सेंट लॉरेन्स नदीतून उगमित झालेल्या झील वर हजार पेक्षा जास्त असलेल्या टापूंची  नैसर्गिक व प्राकृतिक सुंदरता पाहण्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी येतात | तसेच काही अंतरराष्ट्रीय आवागमन होण्यार्‍या पुलांसाठी पण प्रसिद्ध आहे | मुख्यत: नौका विहार , शिबीर , मासोळी पकडने, सुंदर बागीचे , शांतीपूर्ण वातावरण या सर्वांचे खास  आकर्षण आहे  | खास करुन गर्मित पर्यटक ,आणि इकडचे लोक याचा आनंद घेण्यासाठी इथे येऊन राहतात | याच नदीवर एक हाजरपेक्षा जास्त टापू असल्यामुले   हि जागा " १००० आइलॅंड " ह्या नावाने प्रसिद्ध आहे |
या  टापूंची प्राकृतिक सुंदरता कौतुकास्पद आहे | या ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे  मिळून १८०० च्या वरती टापूंची वस्ती असून लाहानात  लहान टापू एक फुटाचा, काही मध्यम आणि मोठ्यात मोठा  टापू {40sq mi } १००  स्क्वेर किमी चा  आहे | हि नदी{ 744mi} ११९७ किमी लांब पर्यंत पसरलेली असून खोल ८२० फिट{250m} आहे | तसेच काही म्युझियम पण पाहण्यासारखे आहेत |  न्यूयोंर्क राज्यातील अश्या या मस्त   "अलेक्ससन्द्रिया बे " मधे आपले स्वागत आहे |
आधी नायग्रा फॉल चा आनंद घेतला मन अगदी प्रसन्न होते | आजचे वातावरण  प्रकाशित गर्म  पण ठण्ड होते | तिकडे काय असेल याची उस्सुकता लागाली होती | दोन तासाचा प्रवास असल्यामुले दूपारी साडे बाराला कोर्टलैंड वरुन " १००० आयालॅंड " करता निघालो |गॅस {पेट्रोल } भरून पहाड़ी रस्त्या वरील नैसर्गिक सौन्दर्य फ़ॉल कलर्स ,पाहत जुने गाने ऐकत १००० आय लैंड च्या जवळ येत असता शहरातील रोअड्स व आजू बाजुच्या साईंड चे सुबक आणि सुदर घरांवर केलेले डेकोरेशन , समोर ची हिरवळ, बसण्याची व्यवस्था ,लाँन ,रंगी - बेरंगी फुलांचे गमले , समोर गाड़ी आणि मागे ग्यारेज वा काय मस्त दिसत होते |आणि बघायला छान वाटत होते| | हे पाहता पाहता आम्ही आयलँडला पोहोचलो  
बोट  निघायला वेळ होता म्हणून आम्ही पायीं फिरत होतो |दोनीकडे मोठे स्टोर्स ,रेस्टोरेंट ,आणि थोड्या अंतरावरच नदी किनार्यावर| खुप छोट्या छोट्या बोट बांधलेला दिसलय त्याचा बाजूला लाकडाची टुमदार व सुदर सजावट केलेली घरे दिसत दिसत होती | ईकडे नवीनच डेकोरेशन पाहायला मिळाले |छोट्या मोठया लाल भोपळ्यान वर रंग बिरंगी रंगाने काढलेली चित्रे फारच मस्त होती | ते पाहत पाहत आम्ही परत बोटीग स्टेशन ला आलो |बोट निघण्याची सुचना दिली जात होती | गर्दी होऊ लागली ,लवकरच आम्ही व सर्व लोक बोट मधे बसलो .बोट निघायची सुचना होऊन लगेच बोट सुरु झाली | 
बोट खुप मोठी असल्यामुळे कोणी वर तर कोणी खाली बसले| आम्ही थोड्यावेल खाली बसलो |दोनी बाजूला घनदाट झाड़ी व छोटे छोटे टापू दिसत होते |बोट मधे चहा ,कॉफी ,नाश्ता ,रेस्टरूम याची पूर्ण व्यवस्था छान होती |थडी असल्यामुळे लोक चहा , कॉफी घेत होते |आम्ही पण पॉपकॉर्न खात खात वरती गेलों |वरुन तर दूर पर्यतचे टापू उंच पाहड छोट्या बोट सर्वे दूरचे फार छान दिसत होते |बोट वर या जागेची माहिती देणे सुरू होते |थोड्या दूर गेल्यावर बोट थांबली | या ठिकाणी     एक खूप मोठे द्वीप आहे | लॉरेन्स  नदीच्या एक हजार टापूंच्या मधोमध वसले असून हार्टच्या आकाराचे बनले असल्यामुळे  " हार्ट आइलॅंड " या नावाने पण प्रसिद्ध आहे|  या मुझीयमला "बोल्द्त कैसेल" म्हणतात | या ठिकाणी लहान मुलांसाठी प्ले हाउस बनलेले आहे | फार कमी लोक या ठिकाणी उतरले व काही चढले |
  पुँन्हा बोट सुरू होऊन वेगाने धावू लागली |छोटे मोठे टापू मागे पडत होते |  पुढे  गेल्यावर  पुन्हा  मोठ्या टापूवर बनलेले "सिगर कॅसल" दिसत होते | परंतु खासगी असल्यामुळे दुरुनच बघावे लागले |बोट वर वेगाने आपटनार्‍या लाटांचा आवाज येऊ लागला |जोरात चालू असलेल्या वार्‍याने थंडी वाजू लागली |यावेळी बोट लेकच्या मधून जात होती | थोड़े पुढे आल्यावर तर असे वाटत होते की आपल्या दोनी बाजूचे उंच पहाड़ अगदी आपल्या जवळ आहेत, व बोट मधून चालली आहे| पाण्याचा घळघळ मधुर आवाज व येत जात असलेले उन हे रमणिय नैसर्गिक सौंदर्य पहाण्यात आम्ही खुप रमलो होते | बोट आणखी पुढे गेल्यावर मोठा ब्रिज दिसू लागला |    हा ब्रिज यू एस व केनडा बार्डर ला जोडनारा होता | या बाजूला त्यांचे बोटिंग स्टेशन दिसत होते |पक्षांची किलबिल चालली होती | केनडा बोर्डर वर चाललेली वाहतुक इत्यादि थोडेफार दिसत होते |   |         
   यावेळी बोट गोल फिरून परतली |समोरचे तर पाहण्या सारखेच होते "जेवीकॉन आयलंड"  हे आयलंड छोट असून यावर बनलेला पुल कॅनडा व यूएस या दोन्ही  आयलंडला जोडणारा असून  पायी चालण्यासाठी आहे | 
 
३० फूट लांब असलेला  ह़ा पुल  जगातील  अंतरराष्ट्रीय  पुलंपैकी सगळ्यात छोटा पुल म्हणून  प्रसिद्ध आहे | | परत येतानी दुसरया बाजूचे नैसर्गिक सौन्दर्य  पाहता पाहता स्टॉप ला येउन पोहोचलो | 
 
या  बाजूला बोटिंग स्टेशन मोठे असून खुप बोट लागलेल्या होत्या |  बाजुलाच  मोठे कार पार्किंग ,मोठे हाटेल्स, रेस्टोरेंट इत्यादि  सर्व व्यवथा आहे|

समर  मधे लोक या टापूवर रहायला येतात तेव्हा भाड्याने  ने पण दिल्या जातात | रहाण्याची पूर्ण सोय असते |आता थंडीचा सीज़न असल्याने जास्त गर्दी नव्हती |परंतु आम्ही मात्र इथला सगळा आनंद घेतला | मनीष व प्राजक्ता बरोबर आमचा बोटचा तीन तासाचा प्रवास मस्त झाला |  पाण्यावरील वसलेले इतके सुंदर जलमहल पाहून आम्ही खूपच आह्लादित झालो | ह्या जागेची अभूतपूर्व छाप मना मधे नेहमीच राहील |
आम्ही तिथून निघालो | पुढे थोड्या अंतरावर असलेल्या पार्क मधे गेलो | पार्क मधे विविध रंगाच्या फुलांनी बाग बहरली होती | समोरच्या शेड मधे बसून आम्ही नास्त्ता केला | समोरचे दृश्य फारच मोहक होते | आम्ही ज्या जागेवर उभे होतो त्या काठावर पाण्याच्या लाटा जोरात येत होत्या | त्याचे पाणी अंगावर उड़त होते |आम्ही ज्या जागेवर उभे होतो त्या काठावर पाण्याच्या लाटा जोरात येत होत्या | त्याचे पाणी अंगावर उड़त होते | 
सुर्याची लाल किरणे पाण्यावर चमकत होती | लाटा वर ख़ाली होत होत्या |पाण्यावर मावळत्या सुर्याचे प्रतिबिम्ब झलकत होते | संध्याकाळ होत आली असल्याने ठंडी वाढत होती | पुन्हा सर्व दृअश एकदा डोळ्यात साठवून तिथून निघालो | येता येता वॉल मार्टला शापिंग करून घरी आलो|  आजची आमुचि सहल मस्त झाली | आज आमचा पूर्ण दिवस छान गेला |
 | जय श्रीराम |




3 comments:

  1. सौ. आई व बाबा

    तुझे ब्लॉग वाचून खूप छान वाटले, तु अग्दि प्रोफीषनल सरखी लिहिते माला पण आता मराठी टाइप करता आले.

    तु ग्रेट आहे मम्मा... हे ब्लाग फारच छान आहे

    तुमची वृष्टि , रेवती
    गजु , दीपु

    ReplyDelete
  2. आई तू फार छान वर्णन केले आहे ..... अस वाटतये जय अपन तिथेच आहो |
    आणि इतकी छान मराठी वाचून किती आनंद जाला सांगू नहीं शकत .......

    सब बच्चा पार्टी की तरफ से ढेर सारा प्यार ...........

    ReplyDelete
  3. प्रिय सौ.आई,
    तुमि हे यात्रा विवरण इतके सुंदर ल्हिले आहेत की कधी पण वाचून एका क्षणात तिथेच असाएचा भास होतो | यात्रा आम्ही सर्वांनी केली, पण ल्हिउन त्या यात्रेला अविस्मरणीय तुमि केले आहेत | ह्या गोड आठवणींना शब्द दिल्या साठी खूप-खूप धन्यवाद | आम्ही सर्वांची हीच इच्छा आहे की असेच सुंदर वर्णन तुमच्या कडून नेहमी वाचायला मिळे |
    Great Work aai ! U rock !

    तुमची लहान लेक
    सौ प्राजक्ता

    ReplyDelete