Sunday, February 21, 2010

पहिला स्नो फोंल

१५ /१० /०९  "श्रीराम समर्थ"  कोर्टलैंड

या आधी  आपण  नैसर्गिक सौंदर्य , फॉल कलर्स , नदी आणि बोटिंगचा आनंद घेतला | आता आपण  आम्ही पाहलेला पहिला स्नो फाल चा आनंद घेऊ | आता आमचा जेट लॉग संपत आला होता | रोजचे रूटीन चालू झाले  | वातावरण छान असल्यामूले आम्ही  दूपारी डॉलर स्टोरला जाऊन विंडो  शॉपिंग केली  आणि  थोड़े पायी फिरून आलो |  जेवण झाल्यावर गोष्टी करता करता  झोपायला  उशीर झाला | बाहेर   रिमझिम  पाउस  पडत  होता   वातावरण ठण्ड झाले होते |
सकाळी उठल्याबरोबर एवढा बर्फ पाहून आंही फार आश्चर्यचकित  झालो  |  पहतो तो दूर  दूर पर्यत बर्फ    पसरलेला होता | सगळी कड़े पांढरेच पांढरे   दिसत होते |  आम्ही तर खुप वेळ पर्यंत पाहतच राहिलो  |  आज इकडे या सिज़नचा पहिला स्नो फ़ॉल होता |
  गाडयांन वर स्नोच्या लेयर जमल्या होत्या | एवढा बर्फ आम्ही प्रथमच बघितला | बाहेर जाऊँन पाहण्याची इच्छा होत होती पण  ठंडी खूप असल्यामुळे  जाव कि नाही विचार करत आसताच मनीषचा बाहेर फिरून स्नो पाहून या म्हनूण फोन आला |आम्हि तयार हून स्वेटर,जर्किन सर्व घालून बाहेर पडलो |प्राजक्ता पण आमचा बरोबर होती |बाहेर पडल्यावर मस्त वाटत होते |
आम्ही थोड पायी फिरत   असता ,मधुनच झाडा वरून पडणारा बर्फ ,थोड़या थोड़या वेळाने वरुन होणारा स्नो हे सर्व पाहत व बर्फा मधून चालत चालत ,.बर्फात उभे राहून बर्फाचे गोले करूँन ऐकमेकाच्या अंगावर टाकत होतो |
मधून मधून रस्त्यावरचा बर्फ साफ करयला गाडी येऊन स्नो काढल्या जात होता हें पाहून आम्हाला खुपच मजा आली |  दहा वाजायला आले होते | आम्ही स्नोचा भरपूर आनंद घेत व सुंदर नजारा पाहत पाहत घरी आलो|

" जय श्रीराम "

1 comment:

  1. वा यार आई डोय्या समोर सीजन चा पहिला स्नो दिसत आहे ........ तूजी वर्णन करण्या ची शैली माला फार आवडते| माला तुजे ब्लोंग वाचून खूब मजा येतो | तू छान छान लिहत रहा आणि आमी छान छान वाचत राहू|

    तुज्या सर्वे पोरान कडून ........ खूब सारा लाड ......

    ReplyDelete