Wednesday, January 27, 2010

पहिला प्रवास

"श्रीराम समर्थ "
"१०/०९/०९  कोर्टलैंड ते नायग्रा फाल्स - २०० मील  
हा जलप्रपात विश्वातील सात आश्चर्या पेकी एक असून  अमेरिकेचा मुख्य पर्यटन स्थळ आहे | या ठिकाणी {१} अमेरिकन फॉल {२} ब्राइडल फॉल {केव ऑफ द विंड्स } {३} हॉर्सशु फॉल {मेड ऑफ द मिस्ट} ह्या जागा पाहण्यासारख्या आहेत| अमेरिकन  फॉल ची उंची १८० फिट {५६मीटर} आणि लांबी १०६० फिट { ३२०मी } आहे|
हॉर्सशू फॉल ची उंची १७३ फिट {५३ मी } लांबी २६०० फिट { ७९० मी } आहे | हे सर्व फॉल नायग्रा गावातील नदीवर असल्यामुळे हि जागा " नायग्रा फॉल्स "या नावाने प्रसिद्ध आहे |       

सर्व प्रथम आम्ही "श्री सदगुरु प्रह्लाद महाराज" व "श्री रेणुका आई"याना साष्टांग नमस्कार करून त्यांचाच आशिर्वादाने आमची अमेरिका भ्रमण यात्रा सुरु केलि | त्यांचाच प्रेरणेने या प्रवासात आम्हाला मिळालेला आनंद व आलेल्या अनुभवाच्या आठवणी ताज्या राहाव्या म्हणून याचे वर्णन या ठिकाणी लिहण्याचा प्रयास केला आहे | घरातील व इतरही सर्वना तो आवडेल अशी मला आशा आहे|
सध्या इकडे फॉल कलर्सचा मोसम असल्या मुले ते बघण्याचा मजा पण काही वेगळ्याच आहे | ठंडी पण सुरु होती | या दोन्ही मोसम चा आनंद आम्हाला ह्या ठिकाणी घेता आल्यामुले खुपच छान वाटले |अजूनही आमचा जेट लॉग चालूच होता |अश्या मस्त आणि सुंदर वातावरणात आम्ही आमचा पहिला प्रवास सुरु करणार होतो |

आजचे वातावरण थंडच होते |सदगुरु " श्री प्रह्लाद महाराज" व " श्री रेणुका आई " याच्या आशिर्वादाने आम्ही मनिष व सौ. प्राजक्ता बरोबर दुपारी ४ वा. कॉर्टलॅंड वरुन नायग्रा फॉल साठी निघालो | प्रथम गॅस {पेट्रोल} भरून रस्त्या वरील फॉल कलर ची सुंदरता पाहत आणि थंड अश्या मस्त वातावरनात आमचा पहिला प्रवास सुरू झाला |

त्याचा आनंद घेत गप्पा- गोष्टी ,जोक्स करता करता संध्याकाळ केव्हा झाली कळलेच नाही |थोडा ब्रेक घेउन   पुढे निघालो | रिमझिम पावसाला सुरवात झाली | रस्त्या वरिल वाहतुक वाढु लागली | लाइटच्या प्रकाशाने रस्त्याचे पावसाळी दृश छान दिसू लागले | अशाच वातावरणात आम्ही रात्री ८.३० ला नायग्रा फॉल ला येऊन पोहोचलो |इकडे पण पाउस पडत होता | डेज़ इन हाटेल ला थांबलो |

आम्ही फ्रेश होऊंन जेवण आटोपले | थोड्या वेळातच फायर वर्क पाहण्यासाठी निघालो |पाउस व थंडीचा मजा घेत घेत फायर वर्क होणार्‍या जागेवर येऊन पोहोचलो | एवढ्या पावसात पण खु़प गर्दी होती | कोणी रेनकोट घातले तर को छत्री घेतली होती | गर्दीतून थोड़े पुढे गेलो समो़रचे दृश्य तर फारच मस्त होते |या बाजूने दर शुक्रवारी फायर वर्क होत असते | एवढ्या पावसात पण ते मनोहर दृश्य बघण्यासाठी खु़प लोक आले होते | आमच्या एका बाजूला फाल वा दुसऱ्या बाजूला कनाडा बोर्डर, वरिल मोट्ठ्या बिल्डिंग, त्यातून होणारी लिफ्ट ची ये जा , केसिनो, सुंदर भव्य लायटिंग वा त्या लायटिंगने लांब पर्यंत दिसणारा कॅनडा,गोल फिरणारे झुले पाहायला खुपच छान वाटले |
पाण्यावर पडणारा लाइट च्या झगमग प्रकाशने फाल वा त्या बाजूचे दृश्य खुपच मस्त दिसत होते | आता गर्दी वाढू लागली आणि थोड्याच वेळात फायर वर्क ला सुरवात झाली |
आकर्षक म्युझिक वर लाल ,हिरवे पिवळे इत्यादी रंगाचे फटाके फुटू लागल्याने वातावरण रंगमय होऊन आकाशात तारे चमकत आहे असेच वाटू लागले |
पंधरा मिनिट आतिशबाजी चालू होती | मनाला मोहित करणारे मनोहर दृश डोळ्यात साठवून नेहमी आठवणीत राहण्यासाठी त्याचा वीडीयो घेऊन ,काही फोटो पण काढले | आजूनही पाउस चालूच होता | एवढ्या पावसात पण हे सर्व पाहण्याचा मजा घेऊन आम्ही हाटेल वर आलो|
दुसरया दिवशी सकाळी चहा , नाश्ता करून आम्ही नायगरा फॉल वर गेलो | तिकीट घेऊन पुढे गेल्यावर सुरक्षा तपासणी हून मोठया हॉल मधून पुढे खाली उतरलो | या ठिकाणी रेनकोट देण्यात आले | ते घालून समोर असलेल्या बोट मधे बसलो | अमेरिकन फॉल : ऊंची 180 फिट (56 मीटर) बोट खूप मोठी होती | काही लोक वरती असलेला मजल्यावर बसले होते | नैसर्गिक सुंदरता मस्त दिसत होती | बोट सुरू झाली, गार वारे लागू लागले, आजु बाजूचे फॉल कलर, हिरवळ, कॅनडा कडील वर्दळ, तिकडचा ट्रॅफिक पण दिसू लागला | यावेळी बोट अमेरिकन फॉल च्या समोरून जात होती | हे पाहत असता अंगावर पाण्याचे फौवारे येत असल्याने थंडी वाजू लागली | कॅनडा बाजूचा येण्यारया बोट दिसू लागल्या | दोन्ही बोट मधील लोक एक मेकाला हात दाखवुन आपला आनंद व्यक्त करीत होते | कोणी वीडियो घेत होते तर कोणी फोटो काढत होते | मधून ऊन येत जात होते | पुढे पुढे जात असता थंडी वाढु लागली |
थोड्या वेळातच आम्ही मेंन स्पॉट ला पोहोचलो | हा स्पॉट 'मेड ऑफ द मिस्ट' ह्या नावाने ओळखला जातो | इथल्या सुंदरतेचे वर्णन तर शब्दात करूच शकत नाही | ते प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे | तिन्ही बाजूने पड़न्यारा पाण्याचा वेग इतका होता की त्याचे पाणी अंगावर येत होते | बोट एकाच ठिकाणी उभी होती पण आपल्याला गोल फिरते असे वाटत होते | सूर्याची सोनेरी किरने पाण्यावर पडून चमकत होती | पाण्याचा घळघळ येणारा आवाज सगळे पाहून मन खूप प्रसन्न झाले | बोट केव्हा परत फिरली समजले नाहीं | कारण वेगाने पडणार्‍या पाण्यातून उडत असलेले फौवारे रूपी पाणी वाफे सारखे दिसत असल्यामुळे ही जागा "मेड ऑफ द मिस्ट " या नावाने ओळखली जात असावी | हा सुंदर नजारा पाहत असतानी बोट परत फिरून जागेवर आली |


नंतर लिफ्ट ने अब्ज़र्वेटरी डेक वरती आलो | उंचावर असल्याने सर्व जागा आणि नैसर्गिक दृश्य पाहण्यासारखे होते | त्या साठी दुरबिन लागलेल्या होत्या | कॉइन टाकूनच बघता येते | ते बघून आम्ही खाली आलो | तीकडून जवळच नदीतून वेगाने पडणारे पाणी जवळून पाहायला मिळाले | बसण्याची जागा होती | दुसर्या स्पॉट करिता छोट्या रस्त्याने पुलावरून तिकडे गेलो |थोड़े चालल्या वर समोर प्रवेश दार होते | आता आम्ही "केव ऑफ़ विंड्स" ला पोहोचलो| तिथून तिकीट घेऊन आत गेल्या वर आतल्या हॉल मधे त्या जागेचा इतिहास व जुने चित्र लागलेले होते | ते पाहून पुढे गेलो | पुन्हा रेन कोट व फूटवेअर देण्यात आले |
नंतर पुढे जाउन लिफ्टने खाली आलो | रेनकोट व फुटवेयर घातले| खूप लोकांचे जाणे यणे चालले होते | सर्व दूर पाणीच पाणी होते त्या मुळे "हरीकेन डेक" वरतीजायला त्रास होत होता | जिन्याला पकडून हिंमत करून वरती गेलो | वेगाने पडणारे पाणी व तुफानी वाऱ्या ने आपण खाली पडतो की काय असे वाटले, भीती वाटू लागली | आम्ही एक मेकाला पकडून दोन सेकेंड पडणार्‍या पाण्या खाली थांबलो थंडी वाजत होती तरी पण या सर्वाचा आनंद घेऊन खाली आलो | मनीष व् प्राजक्ता बरोबर असल्याने खुप छान वाटत होते | नंतर फ्रेश होऊंन लिफ्टने वरती आलो | रेनकोट व् फूटवेअर टाकण्या साठी ड्रम ठेवले होते | या सर्वे चांगल्या वस्तु दान केल्या जातात | समोरच पार्क मधे बसण्याची जागा होती | एवढ्या थंडित सगळे आइसक्रिम खातात हे बघून फार आश्चर्य वाटले | आम्हाला पण आइसक्रीम खाउन छान वाटले | थोड्या वेळ बागीच्यात बसलो | आता ऊन आल्याने वातावरण मस्त झाले होते|
उन थंडीचा मजा घेत तिसऱ्या स्पॉट ला आलो | या जागेचा आकार घोड्याच्या नाल सारखा असल्याने या स्पॉट ला 'होर्सेशु फाल' म्हणतात | इकडे लहान मुलांना खेळायचि जागा , मोठा बगिचा असून गोल सर्कल मधे रंग बेरंगि फुलझाडे , बाजुलच लाल मिच्या लागलेली छोटी छोटी झाड बघायला मजा आली | समोर हिरवल असलेले मोठे ठार त्यातून खाली जाण्यासाठी छोट्या पायवाटा का बाजूने फुलनि सजलेला रस्ता होता | आम्ही त्या रस्त्याने खाली आलो | खुप मोठी जागा असून त्याला सर्व बाजूला रेलिंग लागले होते | नदिचे भव्य पात्र , कॅनडा सिमेवर चालू असलेले आवागमन ,लोकांची ये जा , लाम्ब पर्यत दिसणारा कॅनडा देश पाहण्यात लो असतानि रिमजिम पाउस सुरु झाला | दुपार चे दोन वाजले होते | भूक लागुन आली होती | सगळ काही पाहून झा असल्याने आम्ही परत निघलो | इंडियन रेस्टोरेंट मधे जेवण करुन थोड़े पाई फिरलो
समोर कस्टम विभाग होता | तिकडे जाण्याची मनाई असल्यामुळे बाहेरून दिसत असलेल बघून . हेलीकाप्टर मधे बसण्यासाठी हेली पॅड आलो | तिकीट घेऊन बसलो | वेटिंग चालू होते | आमच वजन करण्यात येऊन नाव आणि वजन लिहले |थोड्या वेळातच आम्ही हेलिकॉप्टर मधे बसण्यासाठी वरती गेलो | आत बसण्याआधी काही सूचना देऊन कानाला हेड फोन लावण्यात आला |लगेच आम्ही हेलीकाप्टर मधे बसलो बेल्ट बांधला | लवकर हेलिकॉप्टरने उडान भरली | तशी आम्हाला भीती वाटू लागली | आम्ही खुर्चीला पक्क पकडून बसलो | जस जसे वरती जाउ लागलो तस तसे खालच नैसर्गिक सोंदर्य , नायग्रा फॉलची सुंदरता पाहण्यात मग्न असल्याने ,भीती संपली होती | वरुन दिसणार रामणीय दृअश् डोळ्यात साठवन्या चा प्रयास करत होतो | आकाश भ्रमण करन्याच आमच स्वप्न आज पूर्ण झाल | यावेळी आम्ही केनडा वरुन उड़त होतो | कॅनडाचे सौंदर्य पण पाहायला मिळाले | मन प्रसन्न होऊन नाचू गाऊ लागल | सर्व बघून आम्हाला फार आनंद झाला | याच आनंदात आम्ही केव्हा खाली आलो कळलेच नाही | ह्या आनंदा चे वर्णन मला लिहुन करता येणार नही | म्हणून विडीओ घेतला | नंतर पण पाहता येइल | आम्ही बाहेर आलो | आजचा दिवस फारच मस्त गेला | याची चर्चा करत याच आनंदात आम्ही रात्री दहा वाजता कोर्टलंड ला घरी येऊन पोहोचलो |
" जय श्रीराम "