Monday, March 15, 2010

gudi padwa

श्रीराम समर्थ "१६ /०३/१०  कोर्टलैंड  मगलवार 
आज मराठी नवीन वर्षाला सुरवात होत आहे | वर्षाचा पहिला व
महत्वाचा सण आपण सगळे मिळून या ठिकाणी साजरा करू या|


स्वागत नववर्षाचे आशा आकांक्षाचे 
  सुख समृद्धीचे पडता दारी पाउल गुडीचे
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

संत परिवार 

Monday, March 1, 2010

दिवाळी

७/१०/०९  दिवाळी "कोर्टलैंड"
|| श्रीराम समर्थ ||

या  आधी आपण स्नो  फॉलचा भरपूर  आनंद घेतला | आता आम्ही अमेरिकेला  साजर्‍या केलेल्या  दिवाळीचा आनंद घेऊ या | इकडे  आपल्या  इथल्या सारखा काहीच माहौल नसतो | बाहेर फटाके उडवण्यासाठी अनुमती {लायसेन्स}  घ्यावी लागते |
घर लाकडाची  असल्यामुळे बाहेर दिवे लावता येत नाहीत | आत कैंडल्स लावु शकतो | तस पुष्कळशा  वस्तु इंडियन स्टोरला मिळतात | या सर्व गोष्टीना सांभाळून  आम्ही या ठिकाणी  कशी मस्त दिवाळी  साजरी केली ते बघुया | कोर्टलंड  मधे साजर्‍या होत असलेल्या दिवाळीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे|

दिवाळी जवळ  आल्याने घर आवरने ,साफ सफ़ाई हि तयारी सुरू होती |वातावरण छान असल्यामूले आम्हि दूपारी  थोड   पायी फिरून आलो | संध्याकाळी  स्यर्‍याक्यूज ला जाऊन  भारतीय दुकानातून घरगुती सामन व दिवाळीची खरेदी करुन रात्रीच लायटिंग पाहत घरी आलो |
उद्यापासून दिवाळी  असल्यामुळे  तयारी सुरू  होती |  सात वर्षाने या दिवाळी ला मनीष आमच्या बरोबर असल्यमुळे खूप छान वाटत होते | जेवण झाल्यावर बसलो असतानिच  आधीच्या दिवाळीच्या आठवणी  ताज्या होऊन  त्या गोष्टी करण्यात इतके रमलो  होतो  कि रात्रीचा एक कसा वाजला हे कळलेच नाही | मनीष व सौ. प्राजक्ता बरोबर पहिली दिवाळी असल्याने उस्सहात काम चालली   होती |
आज  दिवसाची  सुरवात  विदेशी  साजर्‍या होत असलेल्या  दिवाळीच्या  आनंदातच झाली | पहिला दिवस " वसुबरास " बाजरीची भाकरी ,लोणी , गवारफळी ,  पातळभाजी,   गोड  शिरा केला होता | पूजा नैवेद्य झाल्यावर जेवण झाली |यूएस ला बाजरीची भाकरी व लोणी खायला मजा आली |  नंतर फराळाच काय बनवायच याची तयारी केली | संध्याकाळी दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी मॉलला जाऊन आलो | बाहेर रिमझिम पाउस पडत होता | आल्यावर मनिषने  देव घर व बाहेर हॉल मधे लायटिंग केले | अशारितीने दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला |
आज  "धनत्रयोदशी" सणाचा दिवसाची सुरवात स्नो फॉलने झाली  |  इकडचा हा पहिला स्नो फॉल होता | हा दिवस आ म्हाला नेहमी करता स्नो फॉलचा  दिवस म्हणून आठवणीत राहील | आम्ही बाहेर  जाऊन स्नोचा भरपूर आनंद घेऊन आलो |नंतर पूजा व  नेवेद्य झाला धनतेरस म्हणून, मनीषने चांदीच लोटी भांड  | कपड़े प्रेस करण्याचा टेबल आणला होता |  संध्याकाळी पूजा  आरती ,उपासना व जप झाला | इकड़े रांगोळी चांगली मिळत नसल्यामूले खडूने  रांगोळी काढली | अशा प्रकारे धनतेरस साजरी झाली|
आज दिवाळीचा मुख्य दिवस  " अभ्यगस्नान व लक्ष्मी पुजन " दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी लवकरच उठलो  सगळ्याना  औक्षवांन करूँन तेल लावून आंघोळी ऑटोपल्या |
 नंतर  देवाचे औक्षवाण होऊन , देवाची आंघोळ पूजा झाली | सर्वाना फोन वरून " हॅपी दिवाळी " केल नंतर नैवेद्याचा पूर्ण स्वैयपाक झाला | गोड मधे  गुलाम जाम्बुन केले |   सौ.प्राज ताने  फार सुंदर रांगोळी  काढली होती | रंगोंळी व रंग अगदी मैदयासारखे असल्याने रंगोंळी काढायला त्रास झाला |तरी पण  रंगा बरोबर , सेंट व क्वाइन्स ने सजवलेली  रंगोंळी फार मस्त दिसत होती |
पूजेची तयारी  झाली | देवा समोर रंगीत  खडूने रंगोंळी काढून  समोर {पणत्या लावल्या होत्या } मोमबत्या लावल्या होत्या  छान दिसत होते | पुजेत लक्ष्मीच पान ,  चांदीचा सिकका , रुपये, डॉलर गुल दस्त्यतिल फुल ,नैवेद्यासाठी सुकामेवा , फळ , मिठाई  हे सर्व होत |
संध्याकाळी मनीषने "लक्ष्मी पूजन " करून   आरती केली | नंतर उपासना व  जप झाला | अशारितिने लक्ष्मी पुजनाचा सोहळा आनंदात  सर्वसंपन्न झाला | बिना फटक्याची दिवाळी पण मस्त राहिली |  आजचा  पूर्ण दिवस खुपच आनंदात गेला  |
आज  दिवाळीतील " पाडवा " सणाचा  दिवस  असल्याने औक्षावन ,पूजा होउन नैवेद्याच्या स्वयंपाक झाला | मनीष सकाळीच ऑफिसला गेला होता |  आनंदाची गोष्ट म्हणजे  मनीष व सौ प्राजक्ता ची पहिली दिवाळी असल्याने   "दिवाळ सण" साजरा केला| 
जेवणात  पंच पक्वान्न   गुलाबजाम्बुन , केशरीभात , रबडी , काजुकतली , सोहनपापडी आणि बाकी पूर्ण स्वैयपाक होताच | ताटाची सजावट गुलाबांच्या  पाकळ्या  व   रंगीत खडूच्या  रांगोळीने  केली |
उखाणे घेऊन घास घालण्याचा प्रोग्राम झाला| आम्ही चौघानी  पण   उखाणे घेत, गोड गोड खात, गरमा गरम जेवणाचा मजा घेत दिवाळ सणाच्या पार्टीचा आनंद घेतला | खुपच मजा आली| संध्याकाळी  औक्षवान  करून  संत व  खलतकर या दोघांच्या  भेट वस्तू  ऐकमेकाला देवून "दिवाळ  सण " साजरा केला संध्याकाळी  औक्षवान  करून  संत व  खलतकर या दोघांच्या  भेट वस्तू  ऐकमेकाला देवून "दिवाळ  सण " साजरा केला  |
रात्रि  जेवण  झाल्यावर  खुप गप्पा पण  झाल्या | या सर्व गोष्टीचा भरपुर आनंद घेऊन  दिवाळ सण आणि   यावर्षीची दिवाळी  आम्ही अमेरिकेतील कोर्टलंडला साजरी केली |आपण  सर्वजन आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद  | हे नेहमी आमच्या आठवणीत राहिल |
" जय श्रीराम "

Sunday, February 21, 2010

पहिला स्नो फोंल

१५ /१० /०९  "श्रीराम समर्थ"  कोर्टलैंड

या आधी  आपण  नैसर्गिक सौंदर्य , फॉल कलर्स , नदी आणि बोटिंगचा आनंद घेतला | आता आपण  आम्ही पाहलेला पहिला स्नो फाल चा आनंद घेऊ | आता आमचा जेट लॉग संपत आला होता | रोजचे रूटीन चालू झाले  | वातावरण छान असल्यामूले आम्ही  दूपारी डॉलर स्टोरला जाऊन विंडो  शॉपिंग केली  आणि  थोड़े पायी फिरून आलो |  जेवण झाल्यावर गोष्टी करता करता  झोपायला  उशीर झाला | बाहेर   रिमझिम  पाउस  पडत  होता   वातावरण ठण्ड झाले होते |
सकाळी उठल्याबरोबर एवढा बर्फ पाहून आंही फार आश्चर्यचकित  झालो  |  पहतो तो दूर  दूर पर्यत बर्फ    पसरलेला होता | सगळी कड़े पांढरेच पांढरे   दिसत होते |  आम्ही तर खुप वेळ पर्यंत पाहतच राहिलो  |  आज इकडे या सिज़नचा पहिला स्नो फ़ॉल होता |
  गाडयांन वर स्नोच्या लेयर जमल्या होत्या | एवढा बर्फ आम्ही प्रथमच बघितला | बाहेर जाऊँन पाहण्याची इच्छा होत होती पण  ठंडी खूप असल्यामुळे  जाव कि नाही विचार करत आसताच मनीषचा बाहेर फिरून स्नो पाहून या म्हनूण फोन आला |आम्हि तयार हून स्वेटर,जर्किन सर्व घालून बाहेर पडलो |प्राजक्ता पण आमचा बरोबर होती |बाहेर पडल्यावर मस्त वाटत होते |
आम्ही थोड पायी फिरत   असता ,मधुनच झाडा वरून पडणारा बर्फ ,थोड़या थोड़या वेळाने वरुन होणारा स्नो हे सर्व पाहत व बर्फा मधून चालत चालत ,.बर्फात उभे राहून बर्फाचे गोले करूँन ऐकमेकाच्या अंगावर टाकत होतो |
मधून मधून रस्त्यावरचा बर्फ साफ करयला गाडी येऊन स्नो काढल्या जात होता हें पाहून आम्हाला खुपच मजा आली |  दहा वाजायला आले होते | आम्ही स्नोचा भरपूर आनंद घेत व सुंदर नजारा पाहत पाहत घरी आलो|

" जय श्रीराम "

Saturday, February 6, 2010

१००० आइलॅंड

११ /१० /०९    " कॉर्टलॅंड ते आलेक्सन्ड्रिया बे "  ११०  किमी  
"अलेक्ससन्द्रिया बे "  हे  पर्यटकांचे  मुख्य  आकर्षण आहे | ही जागा कॅनडा व यूएस या दोन्ही देशांच्या सीमा जोडणारी असून अदभूत आश्चर्यजनक पाण्याची जागा आहे | कॅनडा मधील ऑंटेरियो राज्यातुन वाहत असलेली सेंट लॉरेन्स नदीतून उगमित झालेल्या झील वर हजार पेक्षा जास्त असलेल्या टापूंची  नैसर्गिक व प्राकृतिक सुंदरता पाहण्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी येतात | तसेच काही अंतरराष्ट्रीय आवागमन होण्यार्‍या पुलांसाठी पण प्रसिद्ध आहे | मुख्यत: नौका विहार , शिबीर , मासोळी पकडने, सुंदर बागीचे , शांतीपूर्ण वातावरण या सर्वांचे खास  आकर्षण आहे  | खास करुन गर्मित पर्यटक ,आणि इकडचे लोक याचा आनंद घेण्यासाठी इथे येऊन राहतात | याच नदीवर एक हाजरपेक्षा जास्त टापू असल्यामुले   हि जागा " १००० आइलॅंड " ह्या नावाने प्रसिद्ध आहे |
या  टापूंची प्राकृतिक सुंदरता कौतुकास्पद आहे | या ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे  मिळून १८०० च्या वरती टापूंची वस्ती असून लाहानात  लहान टापू एक फुटाचा, काही मध्यम आणि मोठ्यात मोठा  टापू {40sq mi } १००  स्क्वेर किमी चा  आहे | हि नदी{ 744mi} ११९७ किमी लांब पर्यंत पसरलेली असून खोल ८२० फिट{250m} आहे | तसेच काही म्युझियम पण पाहण्यासारखे आहेत |  न्यूयोंर्क राज्यातील अश्या या मस्त   "अलेक्ससन्द्रिया बे " मधे आपले स्वागत आहे |
आधी नायग्रा फॉल चा आनंद घेतला मन अगदी प्रसन्न होते | आजचे वातावरण  प्रकाशित गर्म  पण ठण्ड होते | तिकडे काय असेल याची उस्सुकता लागाली होती | दोन तासाचा प्रवास असल्यामुले दूपारी साडे बाराला कोर्टलैंड वरुन " १००० आयालॅंड " करता निघालो |गॅस {पेट्रोल } भरून पहाड़ी रस्त्या वरील नैसर्गिक सौन्दर्य फ़ॉल कलर्स ,पाहत जुने गाने ऐकत १००० आय लैंड च्या जवळ येत असता शहरातील रोअड्स व आजू बाजुच्या साईंड चे सुबक आणि सुदर घरांवर केलेले डेकोरेशन , समोर ची हिरवळ, बसण्याची व्यवस्था ,लाँन ,रंगी - बेरंगी फुलांचे गमले , समोर गाड़ी आणि मागे ग्यारेज वा काय मस्त दिसत होते |आणि बघायला छान वाटत होते| | हे पाहता पाहता आम्ही आयलँडला पोहोचलो  
बोट  निघायला वेळ होता म्हणून आम्ही पायीं फिरत होतो |दोनीकडे मोठे स्टोर्स ,रेस्टोरेंट ,आणि थोड्या अंतरावरच नदी किनार्यावर| खुप छोट्या छोट्या बोट बांधलेला दिसलय त्याचा बाजूला लाकडाची टुमदार व सुदर सजावट केलेली घरे दिसत दिसत होती | ईकडे नवीनच डेकोरेशन पाहायला मिळाले |छोट्या मोठया लाल भोपळ्यान वर रंग बिरंगी रंगाने काढलेली चित्रे फारच मस्त होती | ते पाहत पाहत आम्ही परत बोटीग स्टेशन ला आलो |बोट निघण्याची सुचना दिली जात होती | गर्दी होऊ लागली ,लवकरच आम्ही व सर्व लोक बोट मधे बसलो .बोट निघायची सुचना होऊन लगेच बोट सुरु झाली | 
बोट खुप मोठी असल्यामुळे कोणी वर तर कोणी खाली बसले| आम्ही थोड्यावेल खाली बसलो |दोनी बाजूला घनदाट झाड़ी व छोटे छोटे टापू दिसत होते |बोट मधे चहा ,कॉफी ,नाश्ता ,रेस्टरूम याची पूर्ण व्यवस्था छान होती |थडी असल्यामुळे लोक चहा , कॉफी घेत होते |आम्ही पण पॉपकॉर्न खात खात वरती गेलों |वरुन तर दूर पर्यतचे टापू उंच पाहड छोट्या बोट सर्वे दूरचे फार छान दिसत होते |बोट वर या जागेची माहिती देणे सुरू होते |थोड्या दूर गेल्यावर बोट थांबली | या ठिकाणी     एक खूप मोठे द्वीप आहे | लॉरेन्स  नदीच्या एक हजार टापूंच्या मधोमध वसले असून हार्टच्या आकाराचे बनले असल्यामुळे  " हार्ट आइलॅंड " या नावाने पण प्रसिद्ध आहे|  या मुझीयमला "बोल्द्त कैसेल" म्हणतात | या ठिकाणी लहान मुलांसाठी प्ले हाउस बनलेले आहे | फार कमी लोक या ठिकाणी उतरले व काही चढले |
  पुँन्हा बोट सुरू होऊन वेगाने धावू लागली |छोटे मोठे टापू मागे पडत होते |  पुढे  गेल्यावर  पुन्हा  मोठ्या टापूवर बनलेले "सिगर कॅसल" दिसत होते | परंतु खासगी असल्यामुळे दुरुनच बघावे लागले |बोट वर वेगाने आपटनार्‍या लाटांचा आवाज येऊ लागला |जोरात चालू असलेल्या वार्‍याने थंडी वाजू लागली |यावेळी बोट लेकच्या मधून जात होती | थोड़े पुढे आल्यावर तर असे वाटत होते की आपल्या दोनी बाजूचे उंच पहाड़ अगदी आपल्या जवळ आहेत, व बोट मधून चालली आहे| पाण्याचा घळघळ मधुर आवाज व येत जात असलेले उन हे रमणिय नैसर्गिक सौंदर्य पहाण्यात आम्ही खुप रमलो होते | बोट आणखी पुढे गेल्यावर मोठा ब्रिज दिसू लागला |    हा ब्रिज यू एस व केनडा बार्डर ला जोडनारा होता | या बाजूला त्यांचे बोटिंग स्टेशन दिसत होते |पक्षांची किलबिल चालली होती | केनडा बोर्डर वर चाललेली वाहतुक इत्यादि थोडेफार दिसत होते |   |         
   यावेळी बोट गोल फिरून परतली |समोरचे तर पाहण्या सारखेच होते "जेवीकॉन आयलंड"  हे आयलंड छोट असून यावर बनलेला पुल कॅनडा व यूएस या दोन्ही  आयलंडला जोडणारा असून  पायी चालण्यासाठी आहे | 
 
३० फूट लांब असलेला  ह़ा पुल  जगातील  अंतरराष्ट्रीय  पुलंपैकी सगळ्यात छोटा पुल म्हणून  प्रसिद्ध आहे | | परत येतानी दुसरया बाजूचे नैसर्गिक सौन्दर्य  पाहता पाहता स्टॉप ला येउन पोहोचलो | 
 
या  बाजूला बोटिंग स्टेशन मोठे असून खुप बोट लागलेल्या होत्या |  बाजुलाच  मोठे कार पार्किंग ,मोठे हाटेल्स, रेस्टोरेंट इत्यादि  सर्व व्यवथा आहे|

समर  मधे लोक या टापूवर रहायला येतात तेव्हा भाड्याने  ने पण दिल्या जातात | रहाण्याची पूर्ण सोय असते |आता थंडीचा सीज़न असल्याने जास्त गर्दी नव्हती |परंतु आम्ही मात्र इथला सगळा आनंद घेतला | मनीष व प्राजक्ता बरोबर आमचा बोटचा तीन तासाचा प्रवास मस्त झाला |  पाण्यावरील वसलेले इतके सुंदर जलमहल पाहून आम्ही खूपच आह्लादित झालो | ह्या जागेची अभूतपूर्व छाप मना मधे नेहमीच राहील |
आम्ही तिथून निघालो | पुढे थोड्या अंतरावर असलेल्या पार्क मधे गेलो | पार्क मधे विविध रंगाच्या फुलांनी बाग बहरली होती | समोरच्या शेड मधे बसून आम्ही नास्त्ता केला | समोरचे दृश्य फारच मोहक होते | आम्ही ज्या जागेवर उभे होतो त्या काठावर पाण्याच्या लाटा जोरात येत होत्या | त्याचे पाणी अंगावर उड़त होते |आम्ही ज्या जागेवर उभे होतो त्या काठावर पाण्याच्या लाटा जोरात येत होत्या | त्याचे पाणी अंगावर उड़त होते | 
सुर्याची लाल किरणे पाण्यावर चमकत होती | लाटा वर ख़ाली होत होत्या |पाण्यावर मावळत्या सुर्याचे प्रतिबिम्ब झलकत होते | संध्याकाळ होत आली असल्याने ठंडी वाढत होती | पुन्हा सर्व दृअश एकदा डोळ्यात साठवून तिथून निघालो | येता येता वॉल मार्टला शापिंग करून घरी आलो|  आजची आमुचि सहल मस्त झाली | आज आमचा पूर्ण दिवस छान गेला |
 | जय श्रीराम |




Wednesday, January 27, 2010

पहिला प्रवास

"श्रीराम समर्थ "
"१०/०९/०९  कोर्टलैंड ते नायग्रा फाल्स - २०० मील  
हा जलप्रपात विश्वातील सात आश्चर्या पेकी एक असून  अमेरिकेचा मुख्य पर्यटन स्थळ आहे | या ठिकाणी {१} अमेरिकन फॉल {२} ब्राइडल फॉल {केव ऑफ द विंड्स } {३} हॉर्सशु फॉल {मेड ऑफ द मिस्ट} ह्या जागा पाहण्यासारख्या आहेत| अमेरिकन  फॉल ची उंची १८० फिट {५६मीटर} आणि लांबी १०६० फिट { ३२०मी } आहे|
हॉर्सशू फॉल ची उंची १७३ फिट {५३ मी } लांबी २६०० फिट { ७९० मी } आहे | हे सर्व फॉल नायग्रा गावातील नदीवर असल्यामुळे हि जागा " नायग्रा फॉल्स "या नावाने प्रसिद्ध आहे |       

सर्व प्रथम आम्ही "श्री सदगुरु प्रह्लाद महाराज" व "श्री रेणुका आई"याना साष्टांग नमस्कार करून त्यांचाच आशिर्वादाने आमची अमेरिका भ्रमण यात्रा सुरु केलि | त्यांचाच प्रेरणेने या प्रवासात आम्हाला मिळालेला आनंद व आलेल्या अनुभवाच्या आठवणी ताज्या राहाव्या म्हणून याचे वर्णन या ठिकाणी लिहण्याचा प्रयास केला आहे | घरातील व इतरही सर्वना तो आवडेल अशी मला आशा आहे|
सध्या इकडे फॉल कलर्सचा मोसम असल्या मुले ते बघण्याचा मजा पण काही वेगळ्याच आहे | ठंडी पण सुरु होती | या दोन्ही मोसम चा आनंद आम्हाला ह्या ठिकाणी घेता आल्यामुले खुपच छान वाटले |अजूनही आमचा जेट लॉग चालूच होता |अश्या मस्त आणि सुंदर वातावरणात आम्ही आमचा पहिला प्रवास सुरु करणार होतो |

आजचे वातावरण थंडच होते |सदगुरु " श्री प्रह्लाद महाराज" व " श्री रेणुका आई " याच्या आशिर्वादाने आम्ही मनिष व सौ. प्राजक्ता बरोबर दुपारी ४ वा. कॉर्टलॅंड वरुन नायग्रा फॉल साठी निघालो | प्रथम गॅस {पेट्रोल} भरून रस्त्या वरील फॉल कलर ची सुंदरता पाहत आणि थंड अश्या मस्त वातावरनात आमचा पहिला प्रवास सुरू झाला |

त्याचा आनंद घेत गप्पा- गोष्टी ,जोक्स करता करता संध्याकाळ केव्हा झाली कळलेच नाही |थोडा ब्रेक घेउन   पुढे निघालो | रिमझिम पावसाला सुरवात झाली | रस्त्या वरिल वाहतुक वाढु लागली | लाइटच्या प्रकाशाने रस्त्याचे पावसाळी दृश छान दिसू लागले | अशाच वातावरणात आम्ही रात्री ८.३० ला नायग्रा फॉल ला येऊन पोहोचलो |इकडे पण पाउस पडत होता | डेज़ इन हाटेल ला थांबलो |

आम्ही फ्रेश होऊंन जेवण आटोपले | थोड्या वेळातच फायर वर्क पाहण्यासाठी निघालो |पाउस व थंडीचा मजा घेत घेत फायर वर्क होणार्‍या जागेवर येऊन पोहोचलो | एवढ्या पावसात पण खु़प गर्दी होती | कोणी रेनकोट घातले तर को छत्री घेतली होती | गर्दीतून थोड़े पुढे गेलो समो़रचे दृश्य तर फारच मस्त होते |या बाजूने दर शुक्रवारी फायर वर्क होत असते | एवढ्या पावसात पण ते मनोहर दृश्य बघण्यासाठी खु़प लोक आले होते | आमच्या एका बाजूला फाल वा दुसऱ्या बाजूला कनाडा बोर्डर, वरिल मोट्ठ्या बिल्डिंग, त्यातून होणारी लिफ्ट ची ये जा , केसिनो, सुंदर भव्य लायटिंग वा त्या लायटिंगने लांब पर्यंत दिसणारा कॅनडा,गोल फिरणारे झुले पाहायला खुपच छान वाटले |
पाण्यावर पडणारा लाइट च्या झगमग प्रकाशने फाल वा त्या बाजूचे दृश्य खुपच मस्त दिसत होते | आता गर्दी वाढू लागली आणि थोड्याच वेळात फायर वर्क ला सुरवात झाली |
आकर्षक म्युझिक वर लाल ,हिरवे पिवळे इत्यादी रंगाचे फटाके फुटू लागल्याने वातावरण रंगमय होऊन आकाशात तारे चमकत आहे असेच वाटू लागले |
पंधरा मिनिट आतिशबाजी चालू होती | मनाला मोहित करणारे मनोहर दृश डोळ्यात साठवून नेहमी आठवणीत राहण्यासाठी त्याचा वीडीयो घेऊन ,काही फोटो पण काढले | आजूनही पाउस चालूच होता | एवढ्या पावसात पण हे सर्व पाहण्याचा मजा घेऊन आम्ही हाटेल वर आलो|
दुसरया दिवशी सकाळी चहा , नाश्ता करून आम्ही नायगरा फॉल वर गेलो | तिकीट घेऊन पुढे गेल्यावर सुरक्षा तपासणी हून मोठया हॉल मधून पुढे खाली उतरलो | या ठिकाणी रेनकोट देण्यात आले | ते घालून समोर असलेल्या बोट मधे बसलो | अमेरिकन फॉल : ऊंची 180 फिट (56 मीटर) बोट खूप मोठी होती | काही लोक वरती असलेला मजल्यावर बसले होते | नैसर्गिक सुंदरता मस्त दिसत होती | बोट सुरू झाली, गार वारे लागू लागले, आजु बाजूचे फॉल कलर, हिरवळ, कॅनडा कडील वर्दळ, तिकडचा ट्रॅफिक पण दिसू लागला | यावेळी बोट अमेरिकन फॉल च्या समोरून जात होती | हे पाहत असता अंगावर पाण्याचे फौवारे येत असल्याने थंडी वाजू लागली | कॅनडा बाजूचा येण्यारया बोट दिसू लागल्या | दोन्ही बोट मधील लोक एक मेकाला हात दाखवुन आपला आनंद व्यक्त करीत होते | कोणी वीडियो घेत होते तर कोणी फोटो काढत होते | मधून ऊन येत जात होते | पुढे पुढे जात असता थंडी वाढु लागली |
थोड्या वेळातच आम्ही मेंन स्पॉट ला पोहोचलो | हा स्पॉट 'मेड ऑफ द मिस्ट' ह्या नावाने ओळखला जातो | इथल्या सुंदरतेचे वर्णन तर शब्दात करूच शकत नाही | ते प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे | तिन्ही बाजूने पड़न्यारा पाण्याचा वेग इतका होता की त्याचे पाणी अंगावर येत होते | बोट एकाच ठिकाणी उभी होती पण आपल्याला गोल फिरते असे वाटत होते | सूर्याची सोनेरी किरने पाण्यावर पडून चमकत होती | पाण्याचा घळघळ येणारा आवाज सगळे पाहून मन खूप प्रसन्न झाले | बोट केव्हा परत फिरली समजले नाहीं | कारण वेगाने पडणार्‍या पाण्यातून उडत असलेले फौवारे रूपी पाणी वाफे सारखे दिसत असल्यामुळे ही जागा "मेड ऑफ द मिस्ट " या नावाने ओळखली जात असावी | हा सुंदर नजारा पाहत असतानी बोट परत फिरून जागेवर आली |


नंतर लिफ्ट ने अब्ज़र्वेटरी डेक वरती आलो | उंचावर असल्याने सर्व जागा आणि नैसर्गिक दृश्य पाहण्यासारखे होते | त्या साठी दुरबिन लागलेल्या होत्या | कॉइन टाकूनच बघता येते | ते बघून आम्ही खाली आलो | तीकडून जवळच नदीतून वेगाने पडणारे पाणी जवळून पाहायला मिळाले | बसण्याची जागा होती | दुसर्या स्पॉट करिता छोट्या रस्त्याने पुलावरून तिकडे गेलो |थोड़े चालल्या वर समोर प्रवेश दार होते | आता आम्ही "केव ऑफ़ विंड्स" ला पोहोचलो| तिथून तिकीट घेऊन आत गेल्या वर आतल्या हॉल मधे त्या जागेचा इतिहास व जुने चित्र लागलेले होते | ते पाहून पुढे गेलो | पुन्हा रेन कोट व फूटवेअर देण्यात आले |
नंतर पुढे जाउन लिफ्टने खाली आलो | रेनकोट व फुटवेयर घातले| खूप लोकांचे जाणे यणे चालले होते | सर्व दूर पाणीच पाणी होते त्या मुळे "हरीकेन डेक" वरतीजायला त्रास होत होता | जिन्याला पकडून हिंमत करून वरती गेलो | वेगाने पडणारे पाणी व तुफानी वाऱ्या ने आपण खाली पडतो की काय असे वाटले, भीती वाटू लागली | आम्ही एक मेकाला पकडून दोन सेकेंड पडणार्‍या पाण्या खाली थांबलो थंडी वाजत होती तरी पण या सर्वाचा आनंद घेऊन खाली आलो | मनीष व् प्राजक्ता बरोबर असल्याने खुप छान वाटत होते | नंतर फ्रेश होऊंन लिफ्टने वरती आलो | रेनकोट व् फूटवेअर टाकण्या साठी ड्रम ठेवले होते | या सर्वे चांगल्या वस्तु दान केल्या जातात | समोरच पार्क मधे बसण्याची जागा होती | एवढ्या थंडित सगळे आइसक्रिम खातात हे बघून फार आश्चर्य वाटले | आम्हाला पण आइसक्रीम खाउन छान वाटले | थोड्या वेळ बागीच्यात बसलो | आता ऊन आल्याने वातावरण मस्त झाले होते|
उन थंडीचा मजा घेत तिसऱ्या स्पॉट ला आलो | या जागेचा आकार घोड्याच्या नाल सारखा असल्याने या स्पॉट ला 'होर्सेशु फाल' म्हणतात | इकडे लहान मुलांना खेळायचि जागा , मोठा बगिचा असून गोल सर्कल मधे रंग बेरंगि फुलझाडे , बाजुलच लाल मिच्या लागलेली छोटी छोटी झाड बघायला मजा आली | समोर हिरवल असलेले मोठे ठार त्यातून खाली जाण्यासाठी छोट्या पायवाटा का बाजूने फुलनि सजलेला रस्ता होता | आम्ही त्या रस्त्याने खाली आलो | खुप मोठी जागा असून त्याला सर्व बाजूला रेलिंग लागले होते | नदिचे भव्य पात्र , कॅनडा सिमेवर चालू असलेले आवागमन ,लोकांची ये जा , लाम्ब पर्यत दिसणारा कॅनडा देश पाहण्यात लो असतानि रिमजिम पाउस सुरु झाला | दुपार चे दोन वाजले होते | भूक लागुन आली होती | सगळ काही पाहून झा असल्याने आम्ही परत निघलो | इंडियन रेस्टोरेंट मधे जेवण करुन थोड़े पाई फिरलो
समोर कस्टम विभाग होता | तिकडे जाण्याची मनाई असल्यामुळे बाहेरून दिसत असलेल बघून . हेलीकाप्टर मधे बसण्यासाठी हेली पॅड आलो | तिकीट घेऊन बसलो | वेटिंग चालू होते | आमच वजन करण्यात येऊन नाव आणि वजन लिहले |थोड्या वेळातच आम्ही हेलिकॉप्टर मधे बसण्यासाठी वरती गेलो | आत बसण्याआधी काही सूचना देऊन कानाला हेड फोन लावण्यात आला |लगेच आम्ही हेलीकाप्टर मधे बसलो बेल्ट बांधला | लवकर हेलिकॉप्टरने उडान भरली | तशी आम्हाला भीती वाटू लागली | आम्ही खुर्चीला पक्क पकडून बसलो | जस जसे वरती जाउ लागलो तस तसे खालच नैसर्गिक सोंदर्य , नायग्रा फॉलची सुंदरता पाहण्यात मग्न असल्याने ,भीती संपली होती | वरुन दिसणार रामणीय दृअश् डोळ्यात साठवन्या चा प्रयास करत होतो | आकाश भ्रमण करन्याच आमच स्वप्न आज पूर्ण झाल | यावेळी आम्ही केनडा वरुन उड़त होतो | कॅनडाचे सौंदर्य पण पाहायला मिळाले | मन प्रसन्न होऊन नाचू गाऊ लागल | सर्व बघून आम्हाला फार आनंद झाला | याच आनंदात आम्ही केव्हा खाली आलो कळलेच नाही | ह्या आनंदा चे वर्णन मला लिहुन करता येणार नही | म्हणून विडीओ घेतला | नंतर पण पाहता येइल | आम्ही बाहेर आलो | आजचा दिवस फारच मस्त गेला | याची चर्चा करत याच आनंदात आम्ही रात्री दहा वाजता कोर्टलंड ला घरी येऊन पोहोचलो |
" जय श्रीराम "