Monday, March 15, 2010

gudi padwa

श्रीराम समर्थ "१६ /०३/१०  कोर्टलैंड  मगलवार 
आज मराठी नवीन वर्षाला सुरवात होत आहे | वर्षाचा पहिला व
महत्वाचा सण आपण सगळे मिळून या ठिकाणी साजरा करू या|


स्वागत नववर्षाचे आशा आकांक्षाचे 
  सुख समृद्धीचे पडता दारी पाउल गुडीचे
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

संत परिवार 

Monday, March 1, 2010

दिवाळी

७/१०/०९  दिवाळी "कोर्टलैंड"
|| श्रीराम समर्थ ||

या  आधी आपण स्नो  फॉलचा भरपूर  आनंद घेतला | आता आम्ही अमेरिकेला  साजर्‍या केलेल्या  दिवाळीचा आनंद घेऊ या | इकडे  आपल्या  इथल्या सारखा काहीच माहौल नसतो | बाहेर फटाके उडवण्यासाठी अनुमती {लायसेन्स}  घ्यावी लागते |
घर लाकडाची  असल्यामुळे बाहेर दिवे लावता येत नाहीत | आत कैंडल्स लावु शकतो | तस पुष्कळशा  वस्तु इंडियन स्टोरला मिळतात | या सर्व गोष्टीना सांभाळून  आम्ही या ठिकाणी  कशी मस्त दिवाळी  साजरी केली ते बघुया | कोर्टलंड  मधे साजर्‍या होत असलेल्या दिवाळीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे|

दिवाळी जवळ  आल्याने घर आवरने ,साफ सफ़ाई हि तयारी सुरू होती |वातावरण छान असल्यामूले आम्हि दूपारी  थोड   पायी फिरून आलो | संध्याकाळी  स्यर्‍याक्यूज ला जाऊन  भारतीय दुकानातून घरगुती सामन व दिवाळीची खरेदी करुन रात्रीच लायटिंग पाहत घरी आलो |
उद्यापासून दिवाळी  असल्यामुळे  तयारी सुरू  होती |  सात वर्षाने या दिवाळी ला मनीष आमच्या बरोबर असल्यमुळे खूप छान वाटत होते | जेवण झाल्यावर बसलो असतानिच  आधीच्या दिवाळीच्या आठवणी  ताज्या होऊन  त्या गोष्टी करण्यात इतके रमलो  होतो  कि रात्रीचा एक कसा वाजला हे कळलेच नाही | मनीष व सौ. प्राजक्ता बरोबर पहिली दिवाळी असल्याने उस्सहात काम चालली   होती |
आज  दिवसाची  सुरवात  विदेशी  साजर्‍या होत असलेल्या  दिवाळीच्या  आनंदातच झाली | पहिला दिवस " वसुबरास " बाजरीची भाकरी ,लोणी , गवारफळी ,  पातळभाजी,   गोड  शिरा केला होता | पूजा नैवेद्य झाल्यावर जेवण झाली |यूएस ला बाजरीची भाकरी व लोणी खायला मजा आली |  नंतर फराळाच काय बनवायच याची तयारी केली | संध्याकाळी दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी मॉलला जाऊन आलो | बाहेर रिमझिम पाउस पडत होता | आल्यावर मनिषने  देव घर व बाहेर हॉल मधे लायटिंग केले | अशारितीने दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला |
आज  "धनत्रयोदशी" सणाचा दिवसाची सुरवात स्नो फॉलने झाली  |  इकडचा हा पहिला स्नो फॉल होता | हा दिवस आ म्हाला नेहमी करता स्नो फॉलचा  दिवस म्हणून आठवणीत राहील | आम्ही बाहेर  जाऊन स्नोचा भरपूर आनंद घेऊन आलो |नंतर पूजा व  नेवेद्य झाला धनतेरस म्हणून, मनीषने चांदीच लोटी भांड  | कपड़े प्रेस करण्याचा टेबल आणला होता |  संध्याकाळी पूजा  आरती ,उपासना व जप झाला | इकड़े रांगोळी चांगली मिळत नसल्यामूले खडूने  रांगोळी काढली | अशा प्रकारे धनतेरस साजरी झाली|
आज दिवाळीचा मुख्य दिवस  " अभ्यगस्नान व लक्ष्मी पुजन " दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी लवकरच उठलो  सगळ्याना  औक्षवांन करूँन तेल लावून आंघोळी ऑटोपल्या |
 नंतर  देवाचे औक्षवाण होऊन , देवाची आंघोळ पूजा झाली | सर्वाना फोन वरून " हॅपी दिवाळी " केल नंतर नैवेद्याचा पूर्ण स्वैयपाक झाला | गोड मधे  गुलाम जाम्बुन केले |   सौ.प्राज ताने  फार सुंदर रांगोळी  काढली होती | रंगोंळी व रंग अगदी मैदयासारखे असल्याने रंगोंळी काढायला त्रास झाला |तरी पण  रंगा बरोबर , सेंट व क्वाइन्स ने सजवलेली  रंगोंळी फार मस्त दिसत होती |
पूजेची तयारी  झाली | देवा समोर रंगीत  खडूने रंगोंळी काढून  समोर {पणत्या लावल्या होत्या } मोमबत्या लावल्या होत्या  छान दिसत होते | पुजेत लक्ष्मीच पान ,  चांदीचा सिकका , रुपये, डॉलर गुल दस्त्यतिल फुल ,नैवेद्यासाठी सुकामेवा , फळ , मिठाई  हे सर्व होत |
संध्याकाळी मनीषने "लक्ष्मी पूजन " करून   आरती केली | नंतर उपासना व  जप झाला | अशारितिने लक्ष्मी पुजनाचा सोहळा आनंदात  सर्वसंपन्न झाला | बिना फटक्याची दिवाळी पण मस्त राहिली |  आजचा  पूर्ण दिवस खुपच आनंदात गेला  |
आज  दिवाळीतील " पाडवा " सणाचा  दिवस  असल्याने औक्षावन ,पूजा होउन नैवेद्याच्या स्वयंपाक झाला | मनीष सकाळीच ऑफिसला गेला होता |  आनंदाची गोष्ट म्हणजे  मनीष व सौ प्राजक्ता ची पहिली दिवाळी असल्याने   "दिवाळ सण" साजरा केला| 
जेवणात  पंच पक्वान्न   गुलाबजाम्बुन , केशरीभात , रबडी , काजुकतली , सोहनपापडी आणि बाकी पूर्ण स्वैयपाक होताच | ताटाची सजावट गुलाबांच्या  पाकळ्या  व   रंगीत खडूच्या  रांगोळीने  केली |
उखाणे घेऊन घास घालण्याचा प्रोग्राम झाला| आम्ही चौघानी  पण   उखाणे घेत, गोड गोड खात, गरमा गरम जेवणाचा मजा घेत दिवाळ सणाच्या पार्टीचा आनंद घेतला | खुपच मजा आली| संध्याकाळी  औक्षवान  करून  संत व  खलतकर या दोघांच्या  भेट वस्तू  ऐकमेकाला देवून "दिवाळ  सण " साजरा केला संध्याकाळी  औक्षवान  करून  संत व  खलतकर या दोघांच्या  भेट वस्तू  ऐकमेकाला देवून "दिवाळ  सण " साजरा केला  |
रात्रि  जेवण  झाल्यावर  खुप गप्पा पण  झाल्या | या सर्व गोष्टीचा भरपुर आनंद घेऊन  दिवाळ सण आणि   यावर्षीची दिवाळी  आम्ही अमेरिकेतील कोर्टलंडला साजरी केली |आपण  सर्वजन आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद  | हे नेहमी आमच्या आठवणीत राहिल |
" जय श्रीराम "