या आधी आपण नैसर्गिक सौंदर्य , फॉल कलर्स , नदी आणि बोटिंगचा आनंद घेतला | आता आपण आम्ही पाहलेला पहिला स्नो फाल चा आनंद घेऊ | आता आमचा जेट लॉग संपत आला होता | रोजचे रूटीन चालू झाले | वातावरण छान असल्यामूले आम्ही दूपारी डॉलर स्टोरला जाऊन विंडो शॉपिंग केली आणि थोड़े पायी फिरून आलो | जेवण झाल्यावर गोष्टी करता करता झोपायला उशीर झाला | बाहेर रिमझिम पाउस पडत होता वातावरण ठण्ड झाले होते |
सकाळी उठल्याबरोबर एवढा बर्फ पाहून आंही फार आश्चर्यचकित झालो | पहतो तो दूर दूर पर्यत बर्फ पसरलेला होता | सगळी कड़े पांढरेच पांढरे दिसत होते | आम्ही तर खुप वेळ पर्यंत पाहतच राहिलो | आज इकडे या सिज़नचा पहिला स्नो फ़ॉल होता |
गाडयांन वर स्नोच्या लेयर जमल्या होत्या | एवढा बर्फ आम्ही प्रथमच बघितला | बाहेर जाऊँन पाहण्याची इच्छा होत होती पण ठंडी खूप असल्यामुळे जाव कि नाही विचार करत आसताच मनीषचा बाहेर फिरून स्नो पाहून या म्हनूण फोन आला |आम्हि तयार हून स्वेटर,जर्किन सर्व घालून बाहेर पडलो |प्राजक्ता पण आमचा बरोबर होती |बाहेर पडल्यावर मस्त वाटत होते |
आम्ही थोड पायी फिरत असता ,मधुनच झाडा वरून पडणारा बर्फ ,थोड़या थोड़या वेळाने वरुन होणारा स्नो हे सर्व पाहत व बर्फा मधून चालत चालत ,.बर्फात उभे राहून बर्फाचे गोले करूँन ऐकमेकाच्या अंगावर टाकत होतो |
मधून मधून रस्त्यावरचा बर्फ साफ करयला गाडी येऊन स्नो काढल्या जात होता हें पाहून आम्हाला खुपच मजा आली | दहा वाजायला आले होते | आम्ही स्नोचा भरपूर आनंद घेत व सुंदर नजारा पाहत पाहत घरी आलो|