Friday, November 6, 2009

इथिका दर्शन



श्रीराम | श्री गजानन | श्री रेणुका आई | श्री प्रह्लाद महाराज |
सर्वाना साष्टांग नमस्कार करून आपल्या लेखनाला सुरवात करते |

आज दोन दिवसाच्या जेट लॅग नंतर आम्ही जवळ असलेल्या इथिका ला जायला निघालो | रोडवरील लाइटिंग, लाइनेने चाललेला ट्रॅफिक, थंड हवा छान वाटत होते | थोड्यावेळातच इथिकाला आलो | थोड़े पाई फिरलो | मोठ्या बिल्डिंग , स्टोर, बॅंक, मॉल इत्यादी, सर्व दूर फार सुंदर लाइटिंग केली होती | समोरच असलेल्या मॉल मधे गेलो | विंडो शौपिंग करून बाहेर आलो | नंतर आम्ही लोक 'इथिका कामन्स' ला गेलो | खाली स्वचालित पार्किंग होते | दारावरील बटन दाबल्या वर दार उघडले | समोरच्या विंडो मधून टिकिट बाहेर आले | ते घेऊन दाखविलेला एरो अनुसार गाडी पार्क केली|आणि लिफ्ट ने वरती आलो |


तिकडे मोट्ठी दोन स्टोर्स होते |{१} एसिमुर {२}टार्गेट
{१} एसिमुर स्टोर मधे डेकोरेशन {सर्व प्रकारचे } पेंटिंग , इलेक्ट्रिल ,स्टेशनरी ,इत्यादि

{२} टार्गेट स्टोर ह्याची विशेषता अशी आहे की हे पूंर्ण लाल रंगाचे आहे | काम करणारी सर्व लोक कपडे पण लाल रंगचेच होते ह्याची दूसरी विशेषता म्हणजे ह्याच नावाचे स्टोर यू एस मधे सर्व ठिकाणी ह्याचा रंगाचे राहिल |या ठिकाणी पण वर दिलेले सर्व वस्तू शिवाय उनी कपडे ,जाकेट , व अन्य प्रकारच्या वस्तू होत्या |हे सर्व बघून खुपच छान वाटले | आपण घेतलेले सर्व सामान घेयून पेमेंट काउंटर वर जावे लागते |पेमेंट क्रेडिट कार्ड द्वारे केल्या जाते | कैश पेमेंट फारच कमी होते |

थोड़े बघून आम्ही ने खाली आलो | गाड़ी घेउन दारा पर्यंत आल्या वर समोर असलेल्या विंडो वर टिकिट पेमेंट करून टिकिट पंचिंग केल्यावर आपोआप दार उघडले व आम्ही बाहेर आलो |

थोड़े पुढे आल्यावर त्याच रोड वर मधे मोट्ठी जागा आहे| त्याला इथिका कॉमन्स म्हणतात | त्या ठिकाणी दर शुक्रवारी रात्री १० वा स्व मनोरंजनाचा शो असतो |त्यावेली सर्व लहान , तरुण, वयोवृद्ध, पति-पत्नी ,मूल-मुली एकत्र येउन कोणी डांस करतात , कोणी गान म्हणतात ,काफी , चहा पितात | स्वतहाला आवडेल ते करतात |आनंद घेतात | सर्व बघून या बदल चर्चा करता करता घरी केव्हा पोहोचलो माहिती पडले नाही | घरी आल्यावर जेवलो |अजुनही आमचा जेट लेग चालूच होता |
श्रीराम