Wednesday, October 21, 2009

आगमन


|| श्री गजानन प्रसन्न ||
|| श्रीराम समर्थ ||
श्री प्रह्लाद महाराज नमस्कार |
मी हा ब्लॉग सुरू करतांना तुमचे स्मरण करते|आपल्या कृपने लिहण्याची प्रेरणा झाली|आधी आपण कधि अमेरीकेला जाउ असे वाटल नव्ह्ते परंतु आपली कृपेने आम्हाला अमेरिकेला यायची संधि मिळाली आणि आम्हि अमेरिकेला ०३/१०/०९ ला आमची सुन प्रज़कता बरोबार सुखरूप Newark ला दुपारी ३.३० वाजता आलो|आमचा मुलगा मनीष आम्हला घ्यायला आला होता |सर्वाना खूप आनंद झाला|फोटो काढ़ले नंतर गाड़िने Cortland ला रात्रि ७.३० ला पोहचलो|घरि आल्यवर फ़ार छान वाटले|